Shruti Vilas Kadam
सर्वात आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर हलके फाउंडेशन लावा. यामुळे चेहरा सुंदर आणि चमकदार दिसेल. जास्त फाउंडेशन लावणे टाळा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कन्सिलर लावा. मात्र, कन्सिलर जास्त लावू नका. तुमच्या त्वचेच्या रंगाला जुळणारा कन्सिलर निवडा.
डोळ्यांच्या मेकअपसाठी ब्राऊन, पीच किंवा गोल्डन रंगाचे आयशॅडो वापरा. त्यानंतर आयलाइनर आणि मस्कारा लावा. यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतील.
गालांवर हलक्या गुलाबी किंवा पीच रंगाचा ब्लश लावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी रंग येईल. ब्लश जास्त लावू नका.
गालांवर, नाकावर आणि भुवयांच्या खाली थोडे हायलायटर लावा. यामुळे चेहऱ्याला छान चमक येईल आणि मेकअप अधिक सुंदर दिसेल.
ओठांसाठी न्यूड पिंक, पीच किंवा ब्राऊन रंगाची लिपस्टिक वापरा. त्यावर थोडे लिप ग्लॉस लावा. यामुळे ओठ सुंदर आणि आकर्षक दिसतील.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर चेहऱ्यावर सेटिंग स्प्रे मारा. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत होते. लग्नसराई किंवा सणासुदीच्या कार्यक्रमासाठी ही स्टेप नक्की करा.