Chetan Bodke
सोशल मीडियावर अंकित वालावलकर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावानेच सर्वाधिक फेमस आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपलं निर्भिड मत मांडते.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात रायकीय भूकंप आला, त्यावेळी अंकिताने केलेली पोस्ट सर्वत्र कमाली चर्चेत होती.
अंकिता वालावलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच अंकिताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यासोबतच तिने निसर्गाचे सौंदर्य देखील शेअर केले.
अंकिताने प्रिंटेड कुर्ता परिधान केला असून तिचा सिंपल लूक प्रेक्षकांना फारच भावला आहे.
सोशल मीडियावर अंकिताच्या नव्या फोटोंची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा सुरू असून तिचा गावरान लूक प्रेक्षकांना फारच भावला.
सोबतच, अंकिताने सोशल मीडियावर तिचा एक ट्रॅक्टरवरील फोटो शेअर केला आहे, त्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘चला मग आत्या येऊ का? आता इकडना थेट शेतात चालली म्या...’ अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे.