Shraddha Thik
बहूतेक जण प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे लहान मुलं, तरुणाईसह मोठ्या व्यक्तींमध्येही ही क्रेझ वाढताना दिसत आहे.
प्रत्येक फोटोमध्ये प्रत्येकाला छान दिसायचं असतं. अनेक जण फोटो काढताना पोट दिसू नये म्हणून श्वास खेचून पोट आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात.
तुम्हीही असं करत असाल, तर हे तुम्हाला महागात पडू शकतं. अशा प्रकारे पोट आत खेचण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
फोटोमध्ये स्लिम दिसायचे असले तरीही पोटावर कधीही अनावश्यक दबाव टाकू नये. यामुळे फुफ्फुस आणि आतडे खराब होऊ शकतात. जाणून घ्या
फोटोमध्ये स्लिम दिसण्यासाठी पोटाची चरबी असलेले ब्लोक श्वास रोखून पोट आत खेचतात. हे खूप सामान्य आहे; परंतु शरीरासाठी खूप हानिकारक आहे. असे केल्याने तुमच्या पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो.
पोट आतल्या बाजूने दाबल्याने आतडे संकुचित होतात, ज्यामुळे पचन थांबते. श्वास रोखून आत घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास रोखून पोटावर दबाव वाढवण्याची चूक करणं तुम्हाला महागात पडू शकते.
पोट आतल्या बाजूला खेचल्याने डायाफ्रामची नैसर्गिक हालचाल कमी होते. यामुळे श्वास घेण्याची क्षमतादेखील कमी होऊ लागते, ज्यामुळे फुफ्फुसाची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळे पोट आत घेण्याचा परिणाम थेट तुमच्या फुफ्फुसांवर पडू शकतो.
पोट वारंवार दबाव पडल्याने शरीराची ठेवण किंवा मुद्रा खराब होते. श्वास रोखून पोट आतमध्ये घेतल्यास शरीर पोटाचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या नैसर्गिक आकारात बदल होतो. यामुळे अस्वस्थता, थकवा आणि पाठदुखीची समस्या होऊ शकते.