ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ओझर्डे धबधबा साताऱ्यातील एक निसर्गरम्य धबधबा आहे. जो पाहण्यासाठी ट्रेकिंगची आणि जंगल अनुभवाची मजा घेता येते.
ओझर्डे धबधबा कोयना वाईल्डलाइफ सॅंक्च्युअरीचा भाग असल्यामुळे इथं विविध अनुभवही घेता येईल.
साताऱ्याहून ओझर्डेपर्यंत पोहोचण्यासाठी ठोसेघर आणि पाटण मार्गे सुमारे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो.
सातारा शहरातून ‘कोयनानगर’ कडे जा. यांनंतक सातारा-ठोसेघर-पाटण-कोयनानगर-ओझर्डे असा मार्ग घ्या. कोयनानगरनंतर थोडं अंतर जंगलात पायी जावं लागतं.
या धबधब्यावर जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन कराड आहे. कराडहून टॅक्सी किंवा स्थानिक बसने कोयनानगरपर्यंत जाता येतं.
सातारा / कराडहून कोयनानगरपर्यंत एसटी बस किंवा खाजगी वाहन उपलब्ध आहेत. कोयनानगरहून स्थानिक वाहन किंवा पायी ओझर्डे धबधब्याजवळ जाता येतं.
कोयनानगरहून सुमारे २.५ – ३ किलोमीटर जंगलातील ट्रेक आहे. हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा असून पावसात थोडा घसरणीचा होतो. पायऱ्या आहेत, पण काही ठिकाणी रेलिंग तुटलेली असू शकतात.