Snake Bite: सापाचे विष किती प्रकारचे असते, शरीरावर काय परिणाम होतो?

Priya More

सापाची भीती

साप म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटते. साप चावल्यानंतर बऱ्याचदा माणसाचा जीव जातो.

Snake Bite | Social Media

सापाच्या प्रजाती

भारतात सापांच्या ३०० ते ३५० प्रजाती आहेत. यामधील ६० प्रजाती विषारी आहेत.

Snake Bite | Social Media

विषारी साप

भारतात नाग, मण्यार, व्हायपर आणि सॉ-स्केल्ड व्हायपर हे विषारी साप आहेत.

Snake Bite | Social Media

शरीरावर परिणाम

सापाचे विष हे रसायनांचे एक जटिल मिश्रण असते. ते शरीरातील विविध प्रणालींवर परिणाम करते.

Snake Bite | Social Media

३ प्रकारचे विष

सापांचे विष ३ प्रकारचे असते. यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष, हेमोटॉक्सिक विष आणि सायटोटॉक्सिक विष यांचा समावेश आहे.

Snake Bite | Social Media

अवयव निकामी होते

न्यूरोटॉक्सिक विष हे विष शरीराच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर आणि नसांवर थेट परिणाम करते. या विषामुळे अवयव निकामी होऊ शकतात.

Snake Bite | Social Media

रक्त गोठणे थांबते

हेमोटॉक्सिक विष हे रक्त आणि रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करतात ज्यामुळे रक्त गोठणे थांबते आणि अंतर्गत रक्तस्त्राव होतो.

Snake Bite | Social Media

पेशी नष्ट होतात

सायटोटॉक्सिक विष हे विष चावलेल्या जागेवरील पेशी आणि ऊती नष्ट करतात. यामुळे शरीराला तीव्र सूज, वेदना आणि ऊती मृत होण्याचा धोका असतो.

Snake Bite | Social Media

NEXT: Dalimbacha Juice: रोज १५ दिवस डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

Pomegranate Juice | Social Media
येथे क्लिक करा...