Sakshi Sunil Jadhav
घरातील जुनं कपाट सापांना आकर्षित करू शकतं, कारण त्यांना अंधाऱ्या, थंड आणि शांत जागा आवडतात.
तुटलेले प्लास्टिकचे डबे, लाकडांचे ढीग किंवा निरुपयोगी वस्तू सापांसाठी लपण्याचं सुरक्षित ठिकाण ठरू शकतं.
पावसाळा आणि उन्हाळ्यात लाकडाचे साठवून ठेवणं जास्त धोकादायक ठरू शकतं, कारण या दिवसांत साप अशा जागांचा आश्रय घेतात.
कुंड्यांखाली साचलेलं पाणी आणि ओलावा बेडूक, कीटक आणि उंदीर यांना आकर्षित करतात.
उंदीर आणि बेडूक हे सापांचं आवडतं खाद्य असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे साप घराजवळ येण्याची शक्यता वाढते.
बागेतले वाढलेले गवत आणि दाट झुडपं सापांना लपण्यासाठी आणि राहण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देतात.
वेळेवर लॉन किंवा गवताची छाटणी न केल्यास सापांचा वावर वाढू शकतो.
घराबाहेर किंवा बाल्कनीत उघडे ठेवलेला कचरापेटी (डस्टबिन) उंदीर आणि पाल यांना आकर्षित करतात, ज्यामुळे सापही त्या भागात येऊ शकतात.
घराभोवती स्वच्छता ठेवा, कचरा व लाकडाचा ढीग काढा आणि पाणी साचू देऊ नका. हे सापांपासून सुरक्षित राहण्याचे सर्वात प्रभावी उपाय आहेत.
NEXT: तोंडात गोड, मनात विष! धोकेबाजांना कसं ओळखायचं? चाणक्यांनी दिल्या माणूस ओळखण्याच्या ४ टिप्स