Shruti Vilas Kadam
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात एका राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबात झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील मोहक हास्यामुळे त्यांना 'स्मिता' हे नाव देण्यात आले.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी, स्मिता यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. त्यांच्या एका छायाचित्रामुळे दूरदर्शनच्या संचालकांचे लक्ष वेधले गेले आणि त्यांना अँकर म्हणून संधी मिळाली.
२० व्या वर्षी, त्यांनी श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.
१९८५ साली, भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चित्रपटाच्या सेटवर स्मिता आणि राज बब्बर यांची भेट झाली. त्यांच्या मैत्रीतून प्रेम फुलले आणि हे नाते त्या काळात खूप चर्चेत राहिले.
फक्त ३१ व्या वर्षी, पुत्र प्रतीकच्या जन्मानंतर १५ दिवसांनी, प्रसूतीसंबंधित गुंतागुंतमुळे त्यांचे निधन झाले.
स्मिता यांनी त्यांच्या मेकअप आर्टिस्टला सांगितले होते की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सुहासिनीप्रमाणे सजवावे. त्यांच्या इच्छेनुसारच अंतिम संस्कार करण्यात आले.