ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कधीकधी क्रेडिट कार्ड आपल्याला कर्जातही अडकवते. विशेषतः जेव्हा बिल वेळेवर भरले जात नाही किंवा व्याज वाढत राहते.
पण काही स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचे कार्ड बिल निम्म्याहून अधिक कमी करू शकता.
प्रत्येकवेळी फक्त मिनिमम पेमेंट भरल्याने, तुमची उर्वरित रक्कम वाढत राहते.
नेहमी पूर्ण बिल किंवा बिलाच्या किमान ८०% रक्कम भरण्याचा प्रयत्न करा.
जर कार्डवरील व्याज खूप वाढले असेल, तर बॅलेंस दुसऱ्या बँकेच्या कार्डमध्ये ट्रान्सफर करा.
यामुळे काही महिन्यांसाठी खूप कमी किंवा शून्य व्याजदर मिळू शकते.
एकाच वेळी सर्व बिल भरण्यापेक्षा मोठे बिल ईएमआयमध्ये भरा. ईएमआयवरील व्याजदर कमी होतो आणि पेमेंट सोपे होते.