ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्मार्ट पॅकिंग केल्यास ट्रव्हल बॅगमध्ये जास्त सामान भरले जाते आणि जागा देखील वाचवू शकता. काही स्मार्ट पॅकिंगच्या टिप्स आहेत त्या जाणून घ्या.
तुमचे कपडे दुमडण्याऐवजी ते गुंडाळून ठेवा, यामुळे तुमच्या बॅगेत जास्त जागा वाचेल.
बॅग स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मोजे आणि आतील कपडे झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.
तसेच शूजमध्ये सॉक्स किंवा लहान वस्तू ठेवा, यामुळे अतिरिक्त जागा तयार होते.
जड वस्तू बॅगेच्या तळाशी आणि हलक्या वस्तू बॅगच्या वरती ठेवल्याने बॅग व्यवस्थित सेट होते.
औषधे आणि महत्त्वाची कागदपत्रे वेगळ्या लहान बॅगेत ठेवणे चांगले असते म्हणजे ते नीट राहण्यास मदत होते.
द्रव स्वरुपात असलेले पदार्थ पिशवित गुंडाळून ठेवा, जेणेकरुन बॅगेत काही पडणार नाही.
पॅकिंग करण्यापूर्वी वस्तूंची यादी बनवा जेणेकरून कोणतीही गोष्ट शिल्लक राहणार नाही.