Bharat Jadhav
रात्री एक ते तीनच्या दरम्यान जागं होणं आणि नंतर पुन्हा झोप न लागणं याची अनेक कारणं असतात. यातील शारीरिक आणि मानसिक कारणे काय आहेत ते जाणून घेऊ.
कधीकधी रात्रीच्या वेळी अचानक जागं येणं आणि परत झोप न लागणे ही समस्या अनेकांना जाणवते. शारीरिक आणि मानसिक कारणं तसेच काही वैद्यकीय कारणे देखील असतात.
वाढत्या वयाचा झोपेवर परिणाम होत असतो. वयानुसार आपल्या झोपेचे चक्र बदलत असते. यामुळे आपल्याला रात्री जाग येऊ शकते.
ताणामुळे शरीरातील विशिष्ट मज्जासंस्था सक्रिय होत असते. यामुळे मध्यरात्री जाग येते. यामुळे रक्तदाबात बदल होतो आणि हृदयाची गती वाढत असते.
दीर्घकाळ औषधांचा वापर केल्याने झोपेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यात रात्री अचानक जाग येत असते.
पहाटे जर एक ते तीनच्या दरम्यान तुम्ही झोपेतून उठलात तर यकृताचे कार्य बिघडल्याचे कारण असू शकतं. यकृत बिघडल्यानं रक्ताभिसरणावर परिणाम होत असतो. त्यामुळे झोपेसाठी त्रास होत असतो.
अनेक आजारांमुळे रात्री झोप येत नाही. यात गॅस्ट्रिक आर्थरायटिस, नैराश्य, न्यूरोपॅथी, रजोनिवृत्ती, प्रोस्टेट, कमी सक्रिय असलेल्या थायरॉईड ग्रंथी आणि स्लीप एपनिया यांचा समावेश असतो.
रात्री अचानक उठलात तर शांत राहा आणि जास्त काम करू नका. झोप का येत नाही याचा विचार करू नका. खोल श्वास घ्या किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करावे.
बेडरूम आणि बेड स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे. बेडवर झोपताना, हळू श्वासोच्छवास घ्या. या काळात मोबाईल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे टाळावे.