ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा असे होते, झोपेत असताना मध्यरात्री अचानक जाग आली आणि भूक लागते.
अनेकदा रात्रीचे जेवण करूनही ही भूक लागते यामागचे कारण काय ते जाणून घ्या
ज्यावेळेस तुम्ही रात्री जेवण पुरेसे करत नाही तेव्हा तुम्हाला अपरात्री पुन्हा भूक लागते.
चिंता आणि तणाव ही दोन सर्वात सामान्य कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला रात्री खाण्याची इच्छा होते.
अनेकदा तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते पण ते योग्य नसते, यामुळेच रात्री भूक लागते.
प्रथिनांमध्ये भूक कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते जर तुम्ही कमी प्रथिनेयुक्त आहार घेत असाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल तर तुम्हाला नेहमी भूक लागू शकते. पाण्यामध्ये भूक शमन करणारे गुणधर्म देखील आहेत.