Shraddha Thik
आजकाल प्रत्येकजण मोबाईल फोन वापरतो. त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे.
अनेकांना रात्री फोन वापरण्याची सवय असते. अनेकदा लोक मोबाईल जवळ ठेवून झोपतात. असे करणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
रात्री मोबाईल ठेवताना अंतरावर विशेष लक्ष द्यावे. पुरेशा अंतरावर ठेवल्याने आरोग्याला कोणतीही हानी होत नाही.
एका रिपोर्टनुसार, झोपताना मोबाईल फोन 3 फूट अंतरावर ठेवावा. त्यामुळे मोबाईलमधून निघणारे रेडिएशन शरीरात पोहोचत नाही.
रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होतो. याशिवाय हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. याशिवाय डोळे कोरडे होऊ लागतात.
मोबाईल जास्त वेळ वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे डोकेदुखी होते आणि तणावही निर्माण होतो.