Sleep Problems: काही लोक अंथरुणात पडताच गाढ झोपतात, पण काहींना झोपच लागत नाही, कारण...?

Shruti Vilas Kadam

झोपेची गरज जास्त असेल तर पटकन झोप लागते

दिवसभर पुरेशी विश्रांती न मिळाल्यास शरीराला झोपेची गरज वाढते. त्यामुळे उशीवर डोकं ठेवताच काही लोकांना लगेच झोप येते.

Sleep | pinterest

साधारण १० ते २० मिनिटे लागणे सामान्य

निरोगी व्यक्तींना झोपण्यासाठी साधारण १० ते २० मिनिटे लागणे सामान्य आहे. प्रत्येक व्यक्तीचा झोपेचा पॅटर्न मात्र वेगळा असतो.

Sleep problems | GOOGLE

तणावामुळे झोप उशिरा येऊ शकते

जास्त विचार करणे, चिंता किंवा तणाव यामुळे मेंदू सक्रिय राहतो. त्यामुळे शरीर थकलेले असूनही झोप येण्यास अडचण होऊ शकते.

Late Night Sleeping Problem

शरीराचं 'बॉडी क्लॉक' महत्त्वाचं

आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम झोप आणि जागेपणाची वेळ नियंत्रित करतो. झोपेची वेळ सतत बदलत असल्यास किंवा रात्री उशिरापर्यंत जगण्याची सवय असल्यास झोपायला वेळ लागू शकतो.

sleep | pinterest

कॅफीन आणि स्क्रीन झोप बिघडवू शकतात

संध्याकाळी चहा-कॉफी, निकोटीन तसेच झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा इतर स्क्रीनचा वापर केल्याने मेंदू अधिक सक्रिय राहू शकतो आणि झोप उशिरा येऊ शकते.

Sleep Problems

लगेच झोप लागणेही नेहमी चांगले लक्षण नाही

दररोज उशीवर डोकं ठेवताच १–२ मिनिटांत झोप येत असेल, किंवा दिवसभर खूप झोप येत असेल, तर हे झोपेची गुणवत्ता खराब असल्याचे संकेत असू शकतात.

Sleep Problems

चांगल्या झोपेसाठी रुटीन ठरवा

दररोज एकाच वेळी झोपणे-उठणे, सकाळचा सूर्यप्रकाश घेणे, दिवसभर सक्रिय राहणे, रात्री स्क्रीन कमी करणे आणि झोपण्यापूर्वी शांत वातावरण ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

Sleep Problems | canva

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Sleep Health | pintrest

Black Coffee on Empty Stomach: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यावी का? सुरक्षित की अॅसिडिटीचा धोका, वाचा

Black Coffee on Empty Stomach | Saam Tv
येथे क्लिक करा