Sleep Problems: मध्यरात्री अचानक झोपेतून जाग येते? रात्री झोप उडण्यामागची 'ही' ७ कारणं जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

तणाव आणि चिंता

रात्री वारंवार झोप उडण्यामागे तणाव आणि चिंता हे प्रमुख कारण असू शकते. दिवसभरातील चिंता डोक्यात सुरू राहिल्यास झोप लागण्यास किंवा ती टिकून राहण्यास अडथळा येऊ शकतो.

Late Night Sleeping Problem

चुकीची झोपण्याची जागा

अस्वस्थ बेड, चुकीची झोपण्याची पोझिशन किंवा योग्य आधार न देणारी जागा यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे आरामदायी वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे.

Sleep problems | GOOGLE

निद्रानाश म्हणजे काय?

रात्री वारंवार जाग येणे, जागे झाल्यानंतर पुन्हा झोप न लागणे किंवा पहाटेच झोप उडणे ही निद्रानाशाची लक्षणे असू शकतात. यामुळे दिवसभर थकवा आणि चिडचिड जाणवू शकते.

Mouth Open Sleeping Problem

स्लीप अॅपनियाकडे लक्ष द्या

झोपताना श्वास थांबणे, मोठ्याने घोरणे किंवा गुदमरल्यासारखे होणे ही स्लीप अॅपनियाशी संबंधित लक्षणे असू शकतात. अशा वेळी रात्री अचानक जाग येऊ शकते.

Sleep problems due to menopause | Saam tv

झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा

रात्री झोपण्याआधी मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्सचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी पुस्तक वाचणे किंवा शांत संगीत ऐकणे यांसारख्या आरामदायी गोष्टी करता येतात.

Sleeping Disorder | yandex

दिवसभर सक्रिय राहा

चांगल्या झोपेसाठी सक्रिय जीवनशैली आणि नियमित दिनचर्या उपयुक्त ठरू शकते. दिवसभराची दिनचर्या व्यवस्थित असल्यास रात्री झोप लागण्यास मदत होऊ शकते.

sleep | pinterest

आरामदायी उशी आणि गादी निवडा

चुकीची उशी किंवा गादी शरीराला अस्वस्थ करू शकते आणि त्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे झोपण्यासाठी आरामदायी गादी आणि उशी निवडणे महत्त्वाचे आहे.

Sleep | Saam tv

Neck Darkness Home Remedies: मान, कोपर आणि त्वचेचा काळेपणा दूर करायचाय? मग, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Neck Darkness Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा