Shruti Vilas Kadam
दिवसभरातील ताणतणाव आणि सततच्या विचारांचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो. त्यामुळे झोप लागल्यानंतरही वारंवार जाग येऊ शकते. मानसिक ताण कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
अस्वस्थ गादी, उशी किंवा झोपण्याची जागा यामुळे शरीराला आराम मिळत नाही. परिणामी रात्री वारंवार झोपमोड होऊ शकते. त्यामुळे आरामदायी गादी आणि योग्य उशीची निवड करणे महत्त्वाचे आहे.
रात्री वारंवार जाग येणे, जागे झाल्यानंतर पुन्हा झोप न लागणे किंवा पहाटे लवकर जाग येणे ही अनिद्रेची लक्षणे असू शकतात. यामुळे दिवसभर थकवा आणि चिडचिड जाणवू शकते.
झोपताना श्वास थांबणे, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत घुसमटल्यासारखे वाटणे ही स्लीप एपनियाची संभाव्य लक्षणे आहेत. श्वासोच्छवासात अडथळा आल्याने व्यक्ती अचानक झोपेतून जागी होऊ शकते.
मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्सचा झोपण्यापूर्वी वापर केल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याच्या काही वेळ आधी स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
नियमित आणि सक्रिय दिनचर्या असल्यास रात्री झोप लागण्यास मदत होऊ शकते. दिवसभर शारीरिक हालचाल आणि योग्य दिनचर्या ठेवण्याचा प्रयत्न करा.
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे, मंद संगीत ऐकणे किंवा आवडते शांत काम करणे यामुळे मनाला आराम मिळू शकतो. मात्र, झोपेची समस्या सातत्याने जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.