Priya More
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपट नुकताच रिलीज झाला.
'स्काय फोर्स' चित्रपटाच्या माध्यमातून वीर पहाडियाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
सुशील कुमार शिंदे यांना प्रणिती, प्रिती आणि स्मृती या दोन मुली आहेत.
सुशील कुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे पहाडिया यांचा वीर हा मुलगा आहे.
स्मृती शिंदे यांनी संजय पहाडिया यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांना वीर आणि शिखर ही दोन मुलं आहेत.
संजय पहाडिया हे बिझनेसमन आणि स्मृती शिंदे या निर्मात्या आहेत. सोबो फिल्म्सच्या त्या ओनर आहेत.
वीरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.