कोमल दामुद्रे
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्हाला महागड्या उत्पादनांची गरज नाही, तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता.
बीटचा रस त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते.
जीवनसत्त्व क ने समृद्ध असलेला संत्र्याचा रस त्वचेतील बॅक्टेरिया आणि संसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
किवीचा रसामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. यासोबतच त्वचेच्या समस्याही दूर होतील.
कलिंगड रस प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट होते, ज्यामुळे त्वचेवर आर्द्रता राहते. ग्लो देखील येतो.
लिंबू त्वचेसाठी अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. लिंबाचा रस नियमित प्यायल्याने त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो.
टोमॅटोचा रस त्वचेसाठी खूप आरोग्यदायी आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करतात.
ब्लूबेरीचा रस तुमच्या त्वचेला पोषणही देतो. यामुळे त्वचेला चमक येऊ शकते.