Skin Care: तासनतास रील्स बघायला आवडतात? जाणून घ्या यामुळे फुलासारख्या तुमच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो

Shruti Vilas Kadam

त्वचेवर प्री मेच्योर एजिंग दिसते

ब्लू लाईटच्या सतत संपर्कामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि त्वचा सैल पडण्याची शक्यता वाढते.

Late Night Awake | Saam tv

त्वचा निस्तेज दिसू शकते

जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याने त्वचेचा नॅचरल ग्लो कमी होऊ शकतो. परिणामी चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो.

Late Night Awake | Saam Tv

हायपरपिग्मेंटेशनचा धोका वाढतो

ब्लू लाईटमुळे त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन वाढू शकते. त्यामुळे काळे डाग, पिग्मेंटेशन आणि त्वचेचा असमान रंग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Late Night Awake | Saam Tv

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो

ब्लू लाईटमुळे फ्री रॅडिकल्सची निर्मिती वाढते. हे त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवून त्वचेचे आरोग्य बिघडवू शकतात.

Late Night Awake | Saam Tv

त्वचेचा संरक्षणात्मक थर कमकुवत होऊ शकतो

त्वचेचा नैसर्गिक बॅरियर कमजोर झाल्यास कोरडेपणा, संवेदनशीलता आणि चिडचिडेपणा वाढू शकते. त्यामुळे त्वचा अधिक नाजूक बनते.

Late Night Awake | Saam Tv

लालसरपणाची समस्या वाढू शकते

संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लू लाईटमुळे सूज, जळजळ किंवा लालसरपणा वाढण्याची शक्यता असते.

Late Night Awake | Saam Tv

झोपेवर परिणाम होऊन त्वचा खराब होऊ शकते

रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्याने झोपेचे चक्र बिघडू शकते. अपुरी झोप त्वचेच्या पुनर्निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करून त्वचा अधिक थकलेली दिसू शकते.

Late Night Awake | Saam Tv

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्याला स्प्राउट्स खल्ल्याने शरिराला मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Sprouts Benefit
येथे क्लिक करा