Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Shruti Vilas Kadam

बटाट्याचा रस कसा तयार करावा?

एक ताजा बटाटा स्वच्छ धुऊन किसून घ्या. स्वच्छ कापडातून त्याचा रस काढा. रस ताजा असतानाच वापरा आणि उरलेला रस साठवून ठेवण्याऐवजी फेकून द्या.

Skin Care

त्वचेला ताजेतवाने दिसण्यास मदत होऊ शकते

बटाट्यामध्ये पाणी आणि काही अँटिऑक्सिडंट घटक असतात. बटाट्याचा रस लावल्याने त्वचा काही काळ ताजीतवानी दिसू शकते.

Skin Care

चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत

त्वचेच्या छोट्या भागावर लावून पाहा. त्रास जाणवला नाही तर स्वच्छ त्वचेवर थोडा रस लावा आणि काही मिनिटांनी पाण्याने धुवा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच वापरणे थांबवा.

Skin Care

डाग आणि पिगमेंटेश कमी करते

बटाट्याचा रस लावल्याने काळे डाग किंवा पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा फ्लोलेस दिसते.

Skin Care | Saam TV

टॅनिंग कमी करण्यासाठी फक्त बटाट्यावर अवलंबून राहू नका

उन्हामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी करण्याचे काम बटाट्याचा रस करतो. याच्यासह त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा आणि उन्हात बाहेर पडताना योग्य संरक्षण घ्या.

Face Care | Saam tv

संवेदनशील त्वचा

कच्च्या बटाट्याच्या रसामुळे काही त्वचेची जळजळ, अॅलर्जी किंवा संपर्कजन्य त्वचारोग होऊ शकतात. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेत हा रस वापरणे थांबवावे.

Face Care | Saam Tv

निरोगी त्वचेसाठी योग्य स्किनकेअर निवडा

चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करा, त्वचेला अनुकूल मॉइश्चरायझर वापरा आणि नियमित सनस्क्रीन लावा. पिगमेंटेशन किंवा डागांसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे अधिक फायदेशीर.

Face Care | Saam Tv

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Pooja Sawant | Saam Tv
येथे क्लिक करा