जास्त वेळ बसून राहिल्याने तुमच्या शरीरावर होतात 'हे' घातक परिणाम

Surabhi Jayashree Jagdish

जास्त वेळ बसून राहणं

जास्त वेळ बसून राहणे तुमच्या शरीरासाठी किती घातक ठरू शकते? ही सवय सुरुवातीला सहज वाटते, पण ती आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करते. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

मणक्यावर ताण

सतत बसून राहिल्यामुळे मणक्यावर ताण वाढतो, ज्यामुळे स्लिप डिस्क आणि पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. मणक्याच्या हाडांवर दबाव पडल्याने हालचाल मर्यादित होते.

मान आणि खांद्याचे स्नायू

सतत बसून वाकून काम केल्यामुळे मान आणि खांद्यांच्या स्नायूंमध्ये ताठरता निर्माण होते. ही ताठरता हळूहळू वेदनांमध्ये बदलते. त्यामुळे योग्य पोस्चर राखणं अत्यावश्यक आहे.

कॅलरी बर्नचं प्रमाण कमी

दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण कमी होते. यामुळे वजन वाढू लागते आणि शरीर जड वाटू लागते. ही स्थिती लठ्ठपणाचं कारण ठरू शकते.

रक्ताभिसरण मंदावतं

सतत बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. रक्ताचा प्रवाह कमी झाल्याने शरीरातील अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे नियमित हालचाल करणं आवश्यक आहे.

इन्सुलिन

जास्त वेळ बसल्यामुळे शरीराची इन्सुलिन प्रतिक्रिया कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. ही स्थिती मधुमेहाच्या सुरुवातीचे संकेत असू शकते.

गॅस आणि अपचन

बसून राहिल्यामुळे पोटावर दबाव वाढतो आणि त्यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. पचनसंस्था मंदावते आणि अस्वस्थता वाढते. त्यामुळे जेवणानंतर थोडी हालचाल करणे फायदेशीर ठरते.

व्हेरिकोज व्हेन्स

पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स आणि सूज निर्माण होऊ शकते. ही स्थिती वेदनादायक असतं आणि सौंदर्यावरही परिणाम करते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा