Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली गोड गळ्याची गायिका तसेच अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची ओळख आहे.
'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून घराघरात आर्या आंबेकरची एक गुणी गायिका म्हणून ओळख झाली आहे.
आर्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी गायनाला सुरूवात केली आणि पाच वर्षांची असताना संगीताचे प्रशिक्षण सुरू केले
१६ जून १९९४ ला नागपूरमध्ये जन्मलेली आर्या मराठी गायिका व अभिनेत्री आहे.
आर्याचे वडिल समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर या देखील गायिका आहेत. याशिवाय आर्याची आजी देखील गायिकाच होत्या.
आपल्या गोड आवाजानं रसिकांना आर्या आंबेकर हिनं मंत्रमुग्ध केलं आहे
‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली