Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकाच्या घरात मोबाइल असतो. आत्तातर प्रत्येकाकडे पर्सनल मोबाइल आणि सीम कार्डसुद्धा असतं.
सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे, तुम्ही वापरत असलेल्या सीम कार्डात सोनं असू शकतं. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
होय, SIM कार्डमध्ये अतिशय कमी प्रमाणात सोन्याची पातळ लेयर (gold plating) असते. SIM कार्डवरील गोल्डन कॉन्टॅक्ट पॅड्सवर ही पातळ सोन्याची लेयर चढवलेली असते.
सोनं उत्तम विद्युत चालक (conductor) आणि जंग-प्रतिरोधक असल्यामुळे सिग्नल ट्रान्सफर होण्याचं काम सोपं होतं.
एका SIM कार्डमध्ये अंदाजे 0.5 मिलीग्राम इतकंच सोनं असतं.
साधारणतः 2000 SIM कार्ड्समधून 1 ग्रॅम सोनं मिळू शकतं. जवळपास 2900 SIM कार्ड्स (1 किलो) मधून अंदाजे 1.5 ग्रॅम सोनं मिळू शकतं.
चीनमधील एका व्यक्तीने जुने SIM कार्ड्स गोळा करून अंदाजे 191 ग्रॅम सोनं काढल्याचा दावा केला आहे.
नाही, कारण यासाठी केमिकल प्रोसेस आणि विशेष तंत्रज्ञान लागतं. घरच्या घरी करणे धोकादायक ठरू शकतं.
SIM कार्डमध्ये सोनं असलं तरी त्याचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे काही SIM कार्ड्स जमा करून मोठ्या प्रमाणात सोनं मिळणं शक्य नाही. ही प्रक्रिया फक्त मोठ्या ई-वेस्ट रीसायकलिंग उद्योगासाठीच फायदेशीर ठरते.