Surabhi Jayashree Jagdish
नखं वारंवार कमजोर होऊन सहज तुटत असतील, तर ते हायपोथायरॉइडिझम किंवा शरीरातील लोहाच्या कमतरतेचं संकेत असू शकतात.
अनेक लोक नखांचा वापर टूलसारखा करतात किंवा वारंवार नेल पॉलिश रिमूव्हर वापरतात. त्यामुळे नखं कोरडी पडून तुटू लागतात आणि त्यांची नैसर्गिक रचना बिघडते.
नखांवर दिसणाऱ्या आडव्या किंवा तिरक्या रेघा कधी कधी सामान्य असू शकतात. मात्र नखांवर सरळ आणि खोल रेघा दिसत असतील, तर त्या किडनीच्या आजारांचे किंवा इतर गंभीर विकारांचे संकेत असू शकतात.
नखांवर दिसणारे पांढरे डाग हे झिंकच्या कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते.
नखांवर दिसणाऱ्या काळ्या रेषा या नेल मेलानोमा, सोरायसिस किंवा एंडोकार्डायटिससारख्या आजारांचे संकेत असू शकतात.
नखांचा रंग पिवळा दिसत असेल तर ते फंगल इन्फेक्शन, थायरॉइडचा त्रास, सोरायसिस किंवा मधुमेहाचं लक्षण असू शकतं.
जर वारंवार नखं तुटत असतील, त्यांचा रंग बदलत असेल किंवा त्यावर डाग दिसत असतील, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.