Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023: येत्या आठवड्यात बड्या ग्रहाचे संक्रमण! या राशींना सोन्याचे दिवस, नशीबाची लाभेल साथ

कोमल दामुद्रे

मेष

हा आठवडा काहीसा चिंतेत राहिल. कौंटुबिक समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील मतभेद वाढतील.

वृषभ

आरोग्यामुळे काहीसे चिंतेत राहाल. सामाजिक कार्यात यश मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

मिथुन

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. या आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे घरात आनंद पसरेल.

कर्क

या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात याल ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्रासदायक असेल. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या खास मित्राकडून मोठी फसवणूक होऊ शकते

कन्या

नवीन काम सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात मोठे बदल करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरतील.

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्त लाभ मिळू शकतो. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

वृश्चिक

सासरच्या लोकांकडून मोठी आर्थिक मदत मिळू शकते. या आठवड्यात तुमचे मन आध्यात्मिक भावनांनी भरलेले असेल

धनु

तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येत अडकू शकता यासाठी सावधगिरी बाळगा. नोकरीच्या नव्या संधी मिळतील परंतु, घाई नको.

मकर

आर्थिकदृष्ट्या काहीसा त्रास जाणवेल. मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल.

कुंभ

हा आठवडा उत्तम जाणार आहे. तुम्ही विचार करत असलेले काम पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात नवीन काम सुरू होऊ शकते.

मीन

हा आठवडा तुमच्यासाठी मोठ्या यशाची दारे उघडू शकतो. तुमचे मन संतुलित राहील. तसेच, या आठवड्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ शकता.

Next : डोंगरदऱ्यातून कोसळणारा साताऱ्यातील सगळ्यात उंच धबधबा पाहिलात का?

येथे क्लिक करा