Shraddha Thik
प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिने आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीला आज सर्वजण ओळखतात.
मराठी चित्रपटांव्यतिरिक्त श्रियाने हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
फॅशन सेन्सच्या बाबतीतही श्रिया कोणापेक्षा कमी नाही.
श्रियाकडे साड्यांचे अप्रतिम कलेक्शन देखील आहे ज्यातून तुम्ही देखील लग्नसराईसाठी आयडीया घेऊ शकता.
श्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने जबरदस्त साडीतील फोटो शेअर केले आहेत.
तुम्हाला तुमचा लूक खास बनवायचा असेल तर तुम्ही या साडी लूकही कॅरी करू शकता. अभिनेत्रीचा हा लूक लाजवाब आहे.
तुमचा लुक सर्वात खास बनवण्यासाठी तुम्ही श्रिया पिळगावकरकडून प्रेरणा घेऊ शकता. अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकमधून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.