Ruchika Jadhav
श्रीखंड बनवण्यासाठी फ्रेश ५०० ग्राम दही एका कपड्यात घट्ट बांधून ३ ते ४ तासांसाठी ठेवून द्या.
त्यानंतर घट्ट झालेल्या चक्कामध्ये १०० ग्राम पिठीसाखर टाका.
रंग येण्यात तुम्ही दुधात केसर भिजवून ते देखील टाकू शकता.
सुगंधासाठी तुम्ही त्यात वेलची पूड टाकावी.
श्रीखंडाची चव पिस्त्याचे काप टाकल्याने आनखी वाढते.
यामध्ये चवीसाठी तुम्ही ४ ते ५ बदामाचे काप देखील टाकू शकता.
तयार झालं झटपट आणि स्वादिष्ट गोड श्रीखंड.
हे श्रीखंड रक्षाबंधनसाठी बनवू शकता. पुऱ्यांसोबत श्रीखंड फार छान लागतं.