कोमल दामुद्रे
भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे.
ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा 18 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे.
स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया प्रेरणादायी विचार
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.