ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'द फॅमिली मॅन' आणि 'स्कॅम 1992' सारख्या चित्रपटात अप्रतिम अभिनय करणारी अभिनेत्री श्रेया धनवंतरी मालदीवमध्ये सुट्ट्या साजरी करत आहे.
नुकतेच श्रेया धन्वंतरीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत आहे.
श्रेयाच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही आणि ती नॅचरल लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
श्रेया धन्वंतरीची सुंदर स्माईल चाहत्यांना प्रेमाच्या महासागरात बुडवते.
श्रेया धन्वंतरी सध्या चर्चेत आहे. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तिचा हॉट अवतार पाहून लोक थक्क झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रेया इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे बीचचे लूक चाहत्यांसोबत शेअर करत आहे. काळ्या बिकिनीत गोरीपान श्रेया अगदी बोल्ड दिसत आहे.
श्रेया धन्वंतरीही एक मॉडेल आहे. याशिवाय श्रेया धन्वंतरीनेही अभियांत्रिकीची पदवी घेतली असून तिने पदवीच्या काळातच मॉडेलिंग करिअरमध्ये प्रवेश केला.
मॉडेलिंगनंतर, तिने 2008 मध्ये फेमिना मिस इंडिया साउथ स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात ती पहिली उपविजेती ठरली.
श्रेया धन्वंतरीने 2019 मध्ये इमरान हाश्मीच्या 'व्हाय चीट इंडिया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. द फॅमिली मॅनमध्ये झोयाची भूमिका साकारल्यामुळे श्रेया धन्वंतरीला आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे.
श्रेया इंस्टाग्रामवर खूप अॅक्टीव्ह आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 5.5 लाख फॉलोअर्स आहेत.