Manasvi Choudhary
चाकवताची भाजी ही अत्यंत पौष्टिक आणि चवदार भाजी असते. या भाजीमधील औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असतात. श्रावणात तुम्ही चाकवताच्या भाजीचे सेवन करा.
चाकवताची भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
चाकवताची भाजी बनवण्यासाठी चाकवत भाजी, चणाडाळ, लसूण, मसाला, शेंगदाणे, बेसन, शेंगदाणा कूट हे साहित्य एकत्र करा.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी चाकवताची भाजी स्वच्छ धुवून घ्या. भाजी धुतल्यानंतर बारीक चिरा.
गॅसवर कुकरमध्ये चाकवताची भाजी, शेंगदाणे, चणाडाळ मिक्स करून शिजवून घ्या.
भाजी शिजली की गॅसवर कढईमध्ये फोडणी द्या. फोडणीसाठी ठेचलेला लसूण, जिरे, याची फोडणी द्या. त्यावर भाजी मिक्स करा.
भाजीला मिश्रणात मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि चांगली शिजवून घ्या. भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.
अशाप्रकारे घरच्या घरी चाकवताची झणझणीत भाजी तयार होईल.