Manasvi Choudhary
उन्हाळ्यात संध्याकाळी किंवा रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
दिवसभर शरीरावर जमलेले किटाणू रात्री आंघोळ केल्याने मरून जातात त्वचेच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यामुळे रात्री झोपही चांगली लागते. सकाळी ताजेतवाने वाटते.
तणाव होतो दूर
दिवसभर बाहेर असल्याने रात्री आंघोळ केल्याने शरीरातला थकवा आणि तणाव दूर होतो.
रात्री आंघोळ केल्याने वजन कमी होते. त्याचबरोबर मायग्रेन, शरीरदुखी, सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
उष्णता खूप वाढल्यावर शरीराचे तापमानही खूप वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच रात्री रक्ताभिसरणही चांगले राहते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या