Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात गाडीची पेट्रोल टाकी फुल करणं पूर्णपणे चुकीचं नाही. मात्र पेट्रोल भरताना टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल भरू नये. पेट्रोल भरण्याच्या योग्य पद्धतीकडे लक्ष दिल्यास इंधन सांडण्याचा धोका कमी करता येतो.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची वाफ होण्याची शक्यता असते. पेट्रोल हे उष्णतेमुळे सहज वाफेत बदलणारे इंधन आहे. त्यामुळे इंधनाच्या टाकीची रचना आणि ती योग्य प्रकारे बंद ठेवणं महत्त्वाचं असतं.
टाकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास ते बाहेर सांडू शकतं. त्यामुळे पेट्रोल भरताना टाकी अगदी पूर्ण भरणं टाळावं.
पेट्रोल पंपावरील मशीनच्या नॉझलमध्ये ऑटो-कटची सुविधा असते. टाकीत ठरावीक पातळीपर्यंत पेट्रोल भरल्यावर नॉझल आपोआप बंद होतं आणि आवाज येतो.
पेट्रोलची टाकी पूर्णपणे काठोकाठ भरल्यास इंधनाला प्रसरणासाठी पुरेशी जागा राहत नाही. त्यामुळे पेट्रोल सांडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून टाकीच्या तोंडापर्यंत पेट्रोल भरण्याऐवजी नॉझलचा ऑटो-कट झाल्यावर पेट्रोल भरणं थांबवा.
दिवसाच्या तुलनेत सकाळी आणि रात्री अनेकदा तापमान कमी असतं. त्यामुळे शक्य असल्यास या वेळेत पेट्रोल भरून घेण्याचा पर्याय निवडू शकता.