कोमल दामुद्रे
अनेकदा हा वाद पाहायला मिळतो की जेवल्यानंतर पाणी प्यावे की नंतर? याचे कारण असे की लोकांच्या त्याबद्दलच्या वेगवेगळ्या समजुती आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत.
जेवण करण्यापूर्वी लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील अग्नि तत्वावर प्रभाव पडतो.
त्यामुळे पचनक्रिया प्रभावित होऊन फुगण्याची समस्या निर्माण होते.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास कफ दोष वाढतो.
अन्न पचवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होतो. जर एखाद्याला आधीच पचनाशी संबंधित समस्या असतील तर त्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात.
पाणी पिण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेवण करताना हळुहळु पाणी पिणे
पिण्याचे पाणी खूप थंड किंवा गरम ठेवण्याऐवजी ते कोमट प्या
जर तुम्हाला जेवणादरम्यान पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही ते जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तासानंतर पिऊ शकता.