Surabhi Jayashree Jagdish
दिवाळीमध्ये नवरा बायकोचे नाते घट्ट करणारा दिवस म्हणजे पाडवा असतो.
या दिवळी बायको आपल्या नवऱ्याचे पूजन करते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.
मात्र या दिवशी एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे कोणी कोणाला गिफ्ट द्यायचं.
पाडव्याच्या दिवशी पतीने पत्नी गिफ्ट द्यायचं की पतीने पत्नीला गिफ्ट द्यायंच?
तर याचं उत्तर आहे की, पती आपल्या पत्नीला गिफ्ट देऊन त्यांना आनंदी करतात.
हल्ली फक्त पतीच नाही तर बऱ्याच पत्नी सुद्धा आपल्या नवऱ्याला गिफ्ट देतात.
मात्र पूर्वापार चालत आलेल्या पंरपरेनुसार, सुवासणीकडुन पतीस औक्षण केलं जातं. आणि यानंतर पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो.