Gangappa Pujari
आज, १९ फेब्रूवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
जगभरात महाराजांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली जात आहे.
राज्य सरकारकडून शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...
फक्त भारतातच नव्हेतर उत्साहात लंडनच्या संसद चौकातही शिवजयंती साजरी करण्यात आली.
लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि देशातील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी केली.
या वेळी जय शिवरायच्या घोषणांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.
लंडनमधील शिवजयंतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...