Manasvi Choudhary
आज पासून नऊ दिवस शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
मंदिरामध्ये तसेच घरोघरी घटस्थापना करत दुर्गामातेचे स्वागत केले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते.
आज नवरात्रीचा पहिला दिवस रविवार केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे.
देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून तिची आराधना करावी.
केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आयुष्यात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते.
महिलांचे ग्रुप, कर्मचारी महिला तसेच पुरूष रंगाचे कपडे घालून सण साजरा करतात.