Manasvi Choudhary
नवरात्रौत्सव १५ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरला सोमवारी समाप्त होईल.
नवरात्रौत्सवामध्ये नऊ दिवस देवीला ९ रंगाच्या साड्या नेसून तिची पूजा आणि आरधना केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केशरी रंगांचे कपडे परिधान करावे. हा रंग सकारत्मक उर्जेचे प्रतीक आहे
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगांचे कपडे परिधान करावे. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गडद निळ्या रंगांचे वस्त्र परिधान करावे. निळा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे घालावे. पिवळा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर मन आनंदी ठेवते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरव्या रंगांचे वस्त्र परिधान करावे. हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे
नवरात्रीच्या सातव्या दिवशी राखाडी रंगांचे वस्त्र परिधान करावे.राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे
नवरात्रीमध्ये आठव्या दिवशी जांभळ्या रंगांची वस्त्र परिधान करावे.जांभळा रंगाचे वस्त्र परिधान केल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी मोरपंखी रंगांची कपडे परिधान करावे.मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो