Shreya Maskar
शेव खमणी हा पदार्थ प्रामुख्याने गुजरात, विशेषतः सुरतमधील अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा नाश्त्याला खाल्ला जातो.
शेव खमणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये भिजवलेली चणा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, दही आणि पाणी टाकून जाडसर पेस्ट बनवा.
तयार मिश्रणात चवी पुरते मीठ, साखर, चिमूटभर हळद आणि इनो घालून मिक्स करा. मिश्रण ५ मिनिटे बाजूला करून ठेवून द्या.
एका ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रण चांगले पसरवा आणि १५-२० मिनिटे वाफवून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
त्यानंतर तयार ढोकळा थंड झाल्यावर हाताने कुस्करून एका बाऊलमध्ये काढून घ्या.
छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हिरवी मिरची यांची फोडणी द्या.
शेव खमणीवर तयार फोडणी टाका आणि वरून लिंबाचा रस पिळा. लिंबामुळे शेव खमणीची चव आणखी वाढते.
शेवटी यात वरून चटपटीत शेव, हिरवीगार कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकून शेव खमणीचा आस्वाद घ्या.