Chetan Bodke
‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव लवकरच बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या सायली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने खास चित्रपटासाठी हटके फॅशन केली आहे.
सायलीने निळ्या रंगाच्या पैठणीचा ब्लेझर सूट परिधान करत चित्रपटाच्या प्रमोशनला हजेरी लावली आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सायलीने खास नेल आर्ट केले आहे.
तिने तिच्या नखांवर ‘झिम्मा २’ असं लिहिलं आहे. या खास नेल आर्टने सर्वांचेच लक्ष वेधले.
चित्रपटामध्ये सायलीसोबत शिवानी सुर्वे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर सुद्धा दिसणार आहेत.
चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
तिच्या कामाबद्दल सांगायचे तर, लवकरच तिचा आणि ऋषी सेक्सेनाचा आगामी चित्रपट येतोय.
सायली आणि ऋषी लवकरच ‘समसारा’ या चित्रपटातून एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहे.