ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘काहे दिया परदेस’मध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सायली संजीव.
आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री सायली संजीव प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
मात्र अभिनय ही सायलीची पहिली पसंती नव्हती. तिला एका वेगळ्याच गोष्टीत रस आहे.
सायलीला राजकारणाची प्रचंड आवड आहे. तिला जनतेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, समाजात वेगळं काहीतरी घडवून आणण्याची इच्छा आहे.
अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश केल्याचं तिने सांगितलं.
सायली म्हणते, 'अर्थातच मी राजकारण हा विषय निवडला कारण मी त्याच्यात शिक्षण घेतेय आणि मी सध्या एम ए इन पॉलिटिकल सायन्सपण करतेय.'
ती तिच्या सतत आतमध्ये असलेली गर्जना आहेच जोपर्यंत ती समाजात काही बदल घडवत नाही तो पर्यंत ती चालू राहणार.' सायलीच्या या हिंमतीची अनेकांनी दाद दिली आहे.