ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक तितिक्षा तावडे आहे.
तितिक्षा आपल्या दमदार अभिनय शैलीने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
अगदी कमी वेळीत तितिक्षाने अत्यंत मेहनतीने मनोरंजन विश्वात आपले नाव कमावलं आहे.
सध्या तितिक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करते आहे.
नुकतंच तितिक्षाने पैठणी साडीतील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीवर तितिक्षाने कानात झुमके, नाकात नथ, हातात बांगड्या असा मराठमोळा साज केला आहे.
तितिक्षाच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.