Saturday Horoscope : मित्र-मैत्रिणींसोबत आनंदात दिवस जाईल; 5 राशींची होणार चांदी, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कामावर अधिक लक्ष द्या. जबाबदाऱ्या पुढाकार घेऊन पूर्ण करा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवहारात स्पष्टता ठेवा.

मेष | Saam tv

मिथुन

कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. सकारात्मकता वाढेल. कामात उत्साह आणि पराक्रम वाढेल.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

वृषभ

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारांना वेग येईल, मात्र वैयक्तिक बाबतीत घाई करू नका.

वृषभ राशी | SAAM TV

कर्क राशी

आर्थिक प्रगतीच्या संधी मिळतील आणि योग्य वेळ साधून निर्णय घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. सर्वांना सोबत घेऊन चला.

kark | saam tv

सिंह

कौटुंबिक व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि उत्साहाने काम करा. अडथळ्यांवर मात करण्यासाठी योग्य मार्ग सापडतील.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे चांगले प्रदर्शन होईल. व्यवसायातील संधी वाढतील आणि सहकाऱ्यांची आणि जवळच्या व्यक्तींची मदत मिळेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्च आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा. परदेशाशी संबंधित कामांना वेग मिळू शकतो.

तूळ राशी | saam tv

वृश्चिक

आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश मिळेल.कामात सहकार्य वाढेल. महत्त्वाच्या चर्चा आणि कामांना वेग मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

प्रगती आणि विस्ताराच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नेतृत्वगुण वाढतील.

धनू | saam tv

मकर

कामाचे नियोजन सुधारेल. सहकार्यामुळे यशाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिकतेकडे कल वाढेल आणि नात्यांमध्ये विश्वास कायम राहील.

मकर | Saam Tv

कुंभ

महत्त्वाच्या कामात संयम ठेवा आणि बोलताना मोजकेच बोला. कुटुंबीय व भागीदारांचे सहकार्य मिळेल, मात्र व्यवहारात घाई करू नका.

कुंभ | Saam Tv

मीन

प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचा वेळ घालवाल. नात्यांमध्ये जवळीक वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

Meen | Saam Tv

NEXT : श्रावणात मुली १६ सोमवार उपवास का करतात? या ६ गोष्टी माहीत आहेत का?

16 SHRAVAN SOMVAR | meta ai
येथे क्लिक करा