Shruti Vilas Kadam
सिक्विन साड्या विविध फॅब्रिकमध्ये उपलब्ध असतात. जसे की, जॉर्जेट आणि शिफॉन हलक्या आणि फ्लोईंग लुकसाठी, तर सिल्क आणि व्हेल्वेट हे अधिक रिच आणि फॉर्मल लुकसाठी योग्य असतात. आपल्या प्रसंगानुसार फॅब्रिक निवडा.
साडीवरील सिक्विन नीट शिवलेले आहेत का हे तपासा. सैल किंवा असमान सिक्विन असलेल्या साड्या टाळा, कारण त्या लवकर खराब होऊ शकतात.
गडद रंग जसे की काळा, नेव्ही ब्लू, किंवा मॅरून हे पार्टी किंवा रात्रीच्या कार्यक्रमांसाठी योग्य असतात. तर पेस्टल शेड्स जसे की पिंक, पीच, किंवा लिलाक हे दिवसा किंवा फेस्टिव्हल्ससाठी उत्तम पर्याय आहेत.
सिक्विन साडीला साधा किंवा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज अधिक उठावदार दिसतो. स्लीवलेस, हॉल्टर नेक किंवा डीप नेकलाइन ब्लाउज साडीच्या ग्लॅमरला वाढवतात.
सिक्विन साडी स्वतःच चमकदार असल्यामुळे, अॅक्सेसरीज मिनिमल ठेवा. साधे झुमके, क्लच आणि न्यूट्रल टोन शूज हे लूकला पूर्णता देतात.
लग्नासाठी भरजरी सिक्विन साडी, पार्टीसाठी हलकी आणि मॉडर्न डिझाइन, तर फेस्टिव्हल्ससाठी रंगीबेरंगी आणि ट्रेडिशनल टच असलेली साडी निवडा.
सिक्विन साड्या डेलिकेट असतात, त्यामुळे त्यांची काळजीपूर्वक देखभाल आवश्यक आहे. ड्राय क्लिनिंग करा आणि साडीला फोल्ड करताना टिश्यू पेपरचा वापर करा, ज्यामुळे सिक्विन्स खराब होणार नाहीत.