Sakshi Sunil Jadhav
सण, लग्नकार्य किंवा खास कार्यक्रमाच्या दिवशी साडी नेसताना निऱ्या नीट बसत नाहीत, ही समस्या अनेक महिलांना येते. यासाठी पुढच्या टिप्स लक्षात ठेवा.
साडी नेसण्याआधी ती पूर्णपणे पसरून घ्या आणि पल्लवाची बाजू वेगळी ठेवा, जेणेकरून निऱ्या घालताना गोंधळ होणार नाही.
साडीच्या खालच्या टोकापासून साधारण ५ ते ७ समान निऱ्या घाला, यामुळे साडीला व्यवस्थित आकार मिळतो.
प्रत्येक नीर साधारण दोन बोटांच्या अंतरावर ठेवा, त्यामुळे साडीचा लूक जास्त आकर्षक दिसतो.
सर्व निऱ्या एकत्र करून त्या सेफ्टी पिनने आधीच पिन करून ठेवा, हीच खरी खास ट्रिक आहे.
आता साडी नेसताना थेट या पिन केलेल्या निऱ्या कमरेला लावा, त्यामुळे वेळेची मोठी बचत होते.
या पद्धतीमुळे निऱ्या सारख्या राहतात आणि पुन्हा पुन्हा सरळ करण्याची गरज नसते. ही ट्रिक विशेषतः पैठणी, कांजीवरम आणि बनारसी साडींसाठी खूपच उपयोगी ठरते.
कमी वेळात साडी नेसता येत असल्याने मेकअप, हेअर स्टाईल आणि दागिन्यांसाठी जास्त वेळ मिळतो. सणावार, लग्न किंवा ऑफिस कार्यक्रमात आत्मविश्वासाने आणि परफेक्ट लूकमध्ये साडी नेसता येते.