ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देव पूजा करताना चंदनाचा उपयोग केला जातो. चंदनाचा तुमच्या त्वचेला देखील भरपूर फायदा होतो.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? चंदन वापरल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
चंदन पावडर पाण्यात मिसळून त्यानी अंघोळ केल्यास शरीर दिवसभर ताजेतवाने राहिल.
शरीरावर रॅश किंवा पिंपल्सच्या समस्या असल्यास तुम्ही चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून लावू शकता.
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुमही चंदनाचा लेप लावू शकता.
चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
शरीरातील स्नायू बळकट बनवण्यासाठी तुम्ही चंदनाच्या तेलाचा वापर करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.