साम टिव्ही ब्युरो
समंथा रुथ प्रभू लवकरच एका अॅक्शन चित्रपटामध्ये दिसणार आहे.
समंथा या चित्रपटातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.
'द फॅमिली मॅन' सीझन 2 या वेबसीरिजच्या माध्यमातून समंथाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.
आता आगामी 'यशोदा' या अॅक्शन चित्रपटात समंथा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
समंथाचा 'यशोदा' हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
समंथा सध्या अमेरिकेत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
काही दिवसापूर्वीच समंथाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला असल्याचे सांगितले होते.