Priya More
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आजपासून प्रत्येक टिव्हीवर बिग बॉसचा आवाज सर्वांना ऐकायला मिळेल. आज या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे.
बिग बॉसचे यंदाचे घर कसं असेल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशामध्ये घरातील इनसाईड फोटो समोर आले आहेत.
यावेळी बिग बॉसचे घर युरोपातील स्थापत्यकलेपासून प्रेरणा घेऊन बांधण्यात आले आहे.
कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरूड यांनी स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना चकित करण्यासाठी घराची खास रचना केली आहे.
'बिग बॉस 17'च्या घराचे मुख्य प्रवेशद्वार गार्डन एरियात आहे. त्याच्या बाजूलाच आरामदायी लिव्हिंग रूम आणि त्याच्या शेजारी एक शोभेचे झाड आहे.
बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलाच्या वरती मोठ्या आकाराचा डोळा दिसत आहे. जो या शोच्या विश्वाचे आणि वारशाचे प्रतिनिधित्व करतो.
गार्डन एरियापासून ते लिव्हिंग रूमपर्यंतच्या डोरवेला एक भव्य पेगासस पुतळा आणि कोरल रीफ सदृश तोरणाने सजलेला आहे.
बिग बॉसचे घर खूपच आलिशान आणि मोठं आहे. जे पाहून प्रेक्षकांसह स्पर्धकही थक्क होतील.
बिग बॉसचे हे खर खूपच लग्जरी वाटत आहे. बिग बॉसच्या घराची थीम प्रत्येक वर्षी बदलत असते.
बिग बॉसच्या घराच्या गेटवरच फ्लाइंग हॉर्स तयार करण्यात आला आहे. घरातील पूल एरियाला खूपच जबरदस्त पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे.
बिग बॉसच्या घरातील जिम एरिया खूपच जबरदस्त आहे. या ठिकाणी स्पर्धकांना जिम करायला मिळणार आहे.
स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेले वॉशरूम देखील खूपच जबदस्त आहे. त्यामध्येही आकर्षक डिझाईन करण्यात आले आहे.
बिग बॉसच्या घराची थिम ही रेड आणि गोल्डर कलरची दिसत आहे. हे रंग घराची शोभा आणखी वाढवत आहेत.