Ruchika Jadhav
सैराट या चित्रपटामुळे रिंकू प्रसिद्धी झोतात आली.
आपल्या दमदार अभिनयाने तिने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलंय.
रिंकूला चाहते आर्ची या नावानेच ओळखतात.
मात्र घरी रिंकूला आणखीन एका वेगळ्या नावाने हाक मारली जाते हे तुम्हाला माहितीये का?
तिच्या शाळेमध्ये देखील तिने रिंकू नाही तर प्रेरणा नावाने नोंद केली होती.
रिंकूच्या सर्व कागदपत्रांवर देखील प्रेरणा नाव आहे.
रिंकूच्या अनेक चाहत्यांना आजवर तिचं दूसरं नाव माहिती नव्हतं.