Ruturaj Gaikwad : ऋतु'राज'...९ डावांत ७ शतके ठोकली, वर्ल्ड रेकॉर्डही मोडला

साम टिव्ही ब्युरो

विजय हजारे करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडनं सेमिफायनलमध्ये आसामविरुद्ध शतक ठोकलं.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

ऋतुराज गायकवाडनं क्वार्टर फायनलमध्येही द्विशतक केलं होतं. त्यात त्यानं षटकारांची आतषबाजी केली होती.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं आसामविरुद्ध ८८ चेंडूंत शतक साकारलं. १६८ धावांची तुफानी खेळी केली.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या प्रकारात त्यानं ६० पेक्षा अधिकच्या सरासरीनं धावा कुटल्यात.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

ऋतुराजनं गेल्या ९ डावांत सात शतके झळकावली आहेत. त्यात एक द्विशतक आहे.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

त्यानं मागील सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावांची नाबाद खेळी केली. त्यात लागोपाठ सात षटकार मारले.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

गायकवाड याने यूपीविरुद्ध खेळताना इतिहास रचला. एकाच डावात १६ षटकार ठोकले. या खेळीत १० चौकारही मारले होते.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

टीम इंडियात स्थान न मिळालेल्या ऋतुराजच्या बॅटमधून धावांची बरसात होत आहे. महाराष्ट्राकडून खेळताना तो धावांचा पाऊस पाडत आहे.

Ruturaj Gaikwad | Saam Tv

ऋतुराजला आगामी काळात टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून स्थान मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Ruturaj Gaikwad | Saam Tv
येथे क्लिक करा...