Akshay Baisane | अक्षय बैसाणे
हा आहे नदी किनारी सापडणारा गुळगुळीत दगड, या दगडाला जिवंतपणा देणाऱ्या कलेला म्हणतात स्टोन आर्ट किंवा स्टोन/रॉक पेंटिंग. ही कला फार पुर्वीपासून चालत आलेली आहे.
कणकवलीची कन्या पूजा कदम ही आपल्या पेटिंग्समधून अप्रतिम स्टोन आर्ट कलाकृती तयार करते. आपल्या कलेतून ती या दगडांमध्ये जिवंतपणा आणते.
मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांची सुंदर कलाकृती.
अस्पृश्यांसाठी संघर्ष करणारे, मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले
महात्मा फुले यांच्यावर आधारीत आणखी सुंदर कलाकृती.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा हुबेहुब चेहरा सुंदरपणे साकारला आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांच्या पाठीमागे सावलीसारखी उभी राहणारी माता रमाई.
अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं तेजस्वी चित्र.
शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं निरामय आणि शांत चित्र.
पंढरपूरचा विठोबा, विठुराया,पांडुरंग, किंवा पंढरीनाथ... अवघ्या वारकऱ्यांचा कैवारी.
गुढीपाडव्याची सुंदर कलाकृती. यांसह पूजा कदम स्ट्रींग आर्ट, वारली चित्रकला, पानांवरची चित्रकला, बॉटल आर्ट, विविध शोभेच्या वस्तू बनवणे अशा अनेक कलाकृती तयार करते.
नीरज चोप्रा (भारतीय भालाफेकपटू) यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये २०२१ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.
मनी माऊचं सुंदर स्टोन आर्ट. पूजा ही विविध प्राण्यांचेही सुंदर स्टोन आर्ट बनवते. ती आपल्या कलाकृतीचे फोटोज आणि व्हिडिओज poojakadam__art_ या इन्स्टाग्रामवर शेयर करत असते.
याशिवाय व्यक्तींचेही चित्रं ती सुंदररीत्या स्टोन/रॉक आर्टमधून साकारते. आपल्या कलेच्या माध्यमातून ती स्वतःच्या पायावर उभी असून त्यातूनच रोजगारही कमावते.
थ्री डायमेंशनमधलं घुंबड. तुम्हालाही या स्टोन आर्ट आवडल्यास तुम्ही पूजा कदम हिला इन्स्टाग्रामवर संपर्क साधू शकता. आपल्याला या सर्व कलाकृती आवडल्यास आणि आपण कलाप्रेमी असल्यास ही वेब स्टोरी नक्की शेयर करा.