Satish Daud
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा कोणीही विसरलं नसेलच.
सैराट सिनेमामुळे एका रात्रीत रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर स्टार झाले.
प्रेमकथेवरील आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
गावागावात आर्ची आणि परश्या या दोघांच्या प्रेमाची चर्चा रंगली.
दरम्यान, सैराट सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाली असून अभिनेत्री रिंकू राजगुरूने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये आकाश ठोसर म्हणजेच परश्या रिंकू राजगुरूसोबत दिसत आहे.
रिंकूने नवरीचा तर परश्याने नवरदेवाचा पोशाख परिधान केला आहे.
दोघेही एकमेकांना वरमाला घालताना दिसून येत आहेत.
दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून आर्ची आणि परश्याने लग्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, हे फोटो सैराट या चित्रपटातील असून असं काहीही खऱ्या आयुष्यात घडलेलं नाही, असं रिंकूने सांगितलं आहे.